लग्नाला नकार देणाऱ्या आतेबहिणीवर गोळीबार
लग्नाला नकार देणाऱ्या आतेबहिणीवर गोळीबार केल्याची घटना ठाण्यात घडलीय.
ठाणे : लग्नाला नकार देणाऱ्या आतेबहिणीवर गोळीबार केल्याची घटना ठाण्यात घडलीय.
ठाण्यानजिक कळव्यातील फुले नगरमध्ये ही घटना घडलीय. केवळ लग्नाला नकार दिला म्हणून १५ वर्षांच्या आपल्या आतेबहिणीवर एका तरुणानं गावठी कट्ट्यानं गोळीबार केलाय.
या हल्ल्यात अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झालीय. तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका लग्नात या कमलकांतची आणि मुलीची भेट झाली होती. त्यानंतर, एका खाजगी कंपनीत मुलाखतीला आलोय, असं सांगत त्यानं मुलीच्या घरी काही दिवस मुक्कामही ठोकला होता.
तेव्हापासून तो या मुलीला लग्नाची गळ घालत होता. पण, तिनं लग्नाला दिलेला नकार न पचल्यानं कमलकांतनं या मुलीवर गोळीबार केला.
कमलकांत सैनी असं या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी सैनीला अटक केलीय. ही घटना आपल्या डोळ्यांदेखत घडताना पाहणाऱ्या जखमी तरुणीच्या बहिणीचा जबाबही पोलिसांनी नोंदवलाय.