नागपूर : गांधीबाग परिसरात एका ७२ ज्येष्ठ नागरिकांवर अनोळखी व्यक्तीने गोळ्या झाडल्या. या गोळीबारात एकनाथ निमगडे यांचं निधन झालं. अग्रसेन चौकाजवळच्या एका गल्लीत सकाळी ७.४५ च्या सुमारास हा गोळीबार झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ निमगडे सकाळी दुचाकीने जात असताना बोलण्याचं निमित्त करून त्यांना दोन व्यक्तींनी थांबविले. अचानक तिथे गोळीबाराचा आवाज झाल्याचं परिसरातील नागरिकांनी ऐकलं. निमगडे हे रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळले होते. हल्लेखोरांनी तिथून पळ काढला होता. जखमी निमगडेंना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांना वाचवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न व्यर्थ ठरले.