कल्याण : पहिल्या खान्देश फेस्टिव्हलचं कल्याणमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. कल्याणच्या खडकपाडा भागातील साई चौकात हे फेस्टिव्हल आयोजित करण्यात आलं असून आज या फेस्टीव्हलचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे.


खान्देशी संस्कृती आणि खास खान्देशी पदार्थांची चव चाखण्यासाटी कल्याणकरांनी इथं गर्दी केली आहे. खान्देशी पदार्थांची एक वेगळी ओळख आहे, खान्देशी पदार्थांची सर्वदूर चर्चा देखील आहे. कल्याण, ठाणे आणि मुंबईत मोठ्या प्रमाणावर खान्देशी बांधव आहेत, त्यांनी हा फेस्टिवल आयोजित केला आहे.