रत्नागिरी :  मिरकवाडा समुद्रात मच्छिमारी करणारी बोट बुडाली. पण 8 खलाशांना वाचवण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मासेमारी करण्यासाठी गेलेली नौका मिरकरवाडा बुडाली. मिरकरवाड़ा ब्रेक वॉटर जवळच ही नौका बुडाली. बुडालेल्या या नौकेचे नाव विठू माऊली असे आहे. दरम्यान, या बोटीवरील 8 खलाशाना वाचवण्यात यश आले आहे. रत्नागिरीत मिरकरवाडा बंदरात सर्व खलाशांना ऐन नारळीपौर्णिमेला 8 खलाशांना वाचविण्यात यश आल्याने, दर्या पावला अशी चर्चा सुरु होती.


दापोली तालुक्यातील हर्णै येथील राहणारे बाळकृष्ण पावसे यांच्या मालकीची विठू माऊली ही बोट काल संध्याकाळी बंदरात नांगरुन ठेवली होती. रात्री झालेल्या वादळामुळे बोटीचे दोन्ही नांगर तुटले. बोट मिरकवाडा ब्रेक वॉटर वॉलवर जावून आदळली. तिथेच त्या बोटीला जलसमाधी मिळाली. बोटीवरील 8 खलाशांना वाचवण्यात स्थानिक मच्छिमरांना यश आले आहे. 


दरम्यान घडलेल्या घटनेमुळे बोट मालकाचं लाखो रूपयांचं नुकसान झाले आहे. मत्स विभागाची टीम या ठिकाणी दाखल झाली आणि त्यांनी बुडालेल्या बोटीचा पंचनामा केला आहे.