एकाचवेळी ५ जणांकडून आत्महत्येचा प्रयत्न, तरूणी बचावली
एकाच कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना धुळ्यात घडली आहे. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला असून १ तरुणी बचावलीय.
धुळे : एकाच कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना धुळ्यात घडली आहे. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला असून १ तरुणी बचावलीय. या कुटुंबानं हे टोकाचं पाऊल का उचललं, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. यापैकी पिंटू आसाराम भिल, शिवदास पिंटू भिल, मोठा भाऊ पिंटू भिल यांनी सूरतकडे जाणाऱ्या प्रेरणा एक्स्प्रेसखाली आत्महत्या केली.
नरडाणा रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. तर त्यांच्यासोबत असलेल्या ३६ वर्षीय महिलेनं १६ वर्षीय मुलीसह रेल्वे रुळाजवळ असलेल्या विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. त्यात महिलेचा मृत्यू झाला, तर १६ वर्षीय मुलगी बचावली. हे सर्वजण मूळचे अमळनेर तालुक्यातील ब्राम्हणे इथले रहिवासी आहेत. सध्या ते म्हळसर गावात वास्तव्याला होते. अवैध दारू निर्मितीच्या वादातून या कुटुंबानं सामूहिक आत्महत्येचा मार्ग निवडल्याचं बोललं जातंय.