पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणारं खडकवासला धरण 100 टक्के भरलंय. त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून पाणी सोडायला सुरूवात झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

19000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे त्यामुळे मुठा नदीला पूर आलाय. नदीपात्रातल्या रस्त्यावर उभी असलेली वाहनं पाण्याखाली गेली आहेत. 


पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान पुणे शहरात सुरू असलेली पाणीकपात मागे घेण्यात आली आहे. 


तसा निर्णय आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आलाय. सध्या पुणे शहरात एक दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे.