अमरावती : शेतकरी व ग्राहक यांच्या मधात असलेली दलाल व व्यापारी यांची साखळी तोडून शेतकऱ्यांचा शेतमाल ग्राहकांपर्यंत वाजवी भावात पोहचविण्याचा अतिशय आगळा वेगळा उपक्रम 'फ्रेंड्स फॉर फार्मर' या संस्थेने धान्य महोत्सवाच्या माध्यमातून सुरु केला आहे. हा उपक्रम पाच मेपर्यंत सुरु राहणार आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतात दिवस रात्र काबाड कष्ट करून पिकवला जाणार शेतमाल दलाल व व्यापाराच्या दुष्टचक्रात अडकून योग्य भाव व नफा कधीच शेतकरी पर्यंत पोहचत नाही. त्याच वेळी भेसळयुक्त माल ग्राहाकच्या माथी चढ्या किमतीत मारल्या जातो... शेतकाऱ्यांचा मालाला योग्य भाव मिळावा व ग्राहकांनाही शुद्ध व चांगल्या प्रतीचे धान्य मिळावे हा हेतू समोर ठेवून अमरावती येथील फ्रेंड्स फॉर फॉर्मर या सामाजिक संस्थेच्या वतीने राज्याच्या विविध  भागातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले वेगेगळे धान्य ग्राहकांकरीता अत्यन्त माफक दरात उपलब्ध झाला आहे. 


स्वतः शेतात पिकविलेल्या धान्याला व्यापारी आणि दलाल मुक्त बाजार उपलब्ध करून दिल्याने शेतकरी आनंदात आहे. शेतकरी ते ग्राहक अशी शेतमाल विक्रीची व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे. यात दोन्ही घटकांचा फायदा आहे. अमरावती जिल्ह्यातील संत्री, तूरडाळ, चनाडाळ यांच्या विक्रीसाठी पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी मदत केली होती. याच धर्तीवर अमरावतीमध्ये त्या भागात होत असलेले धान्य थेट ग्राहकांना पोहचविण्याची व्यवस्था उभी करून देण्यात आली आहे


शेतकरी व ग्राहक या दोन्ही घटकांच्या फायद्याची ही चळवळ वाढीस लागणे आज काळाची गरज आहे. यासाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून का होईना बळीराजाला त्याचा हक्काचा योग्य दाम मिळून त्याच्या मेहनतीचे चीज होईल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटतेय.