पंढरपूर : 'मानाचे वारकरी' म्हणून यंदा विठ्ठलाची पूजा करण्याची संधी हरिभाऊ फुंदे आणि सुनिता फुंदे या दाम्पत्याला मिळालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करताना मंदिराच्या बाहेर रांगेत असलेल्या एका दांम्पत्याला वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजेमध्ये सहभागी होण्याचा मान दरवर्षी दिला जातो. यंदा हा मान अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातल्या फुंदेटाकळी या गावातील हरिभाऊ फुंदे आणि सुनिता फुंदे यांना मिळालाय.


फुंदे दांपत्य गेल्या चार वर्षांपासून नित्य नेमानं वारी करत असून हरिभाऊ फुंदे हे माजी सैनिक आहेत. 


शासकीय महापूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना दर्शनासाठी विठ्ठल मंदीर खुलं करण्यात आलंय. विठुरायाच्या गाभाऱ्यात वारकऱ्यांची गर्दी झालीय.