भंडारा : भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यात एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. ही महिला माहेराहून सासरी चालली होती. बस स्टँडवर सोडण्याच्या बहाण्याने दोघांनी या महिलेची दिशाभूल करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच दिवस या नराधरमांनी या महिलेवर वारंवार बलात्कार केला. पीडित महिला आरोपींच्या तावडीतून कशीबशी आपल्या गावात पोहचली. तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी करडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. 


या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय. दिलीप शेंडे आणि तुषार शेंडे अशी या दोन आरोपींची नावे आहेत. आरोपींवर भादवि 376 कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय.