पुण्यात कचऱ्यावरुन राजकारण पेटलं
पुण्यातील कचरा डेपोची आग विझत आली असली तरी त्यावरून सुरु असलेल्या राजकारणाणं चांगलाच पेट घेतलाय. कचरा डेपोग्रस्त ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे शहरात कचराकोंडी झालीय.
पुणे : पुण्यातील कचरा डेपोची आग विझत आली असली तरी त्यावरून सुरु असलेल्या राजकारणाणं चांगलाच पेट घेतलाय. कचरा डेपोग्रस्त ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे शहरात कचराकोंडी झालीय.
कचरा प्रश्नावर तोडगा निघाला नसतानाच शहराच्या महापौर तसेच पालकमंत्री विदेश दौर्यावर गेले आहेत. या पार्श्वभूमिवर विरोधक आणि सत्ताधार्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. रोज काहीना काही स्वरुपाची आंदोलनं सुरु आहेत.
आजदेखील आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी कचराडेपोची अंत्ययात्रा काढली. मंतरवाडी चौक ते कचराडेपो अशा या अंत्ययात्रेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील सहभागी झाल्या होत्या.
कचरा डेपोबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. राज्य सरकार तसेच महापालिकेतील सत्ताधारी कचरा प्रश्नाबाबत गंभीर नसल्याचही त्यांनी म्हटलंय.