जालना : जिल्ह्यातल्या भोकरदन महामार्गावर राजूरजवळ एका टँकरमधून वायू गळती झाली. सात तासानंतरही ही वायुगळती थांबलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटनेनंतर टँकरचालकाने पोबारा केला. दरम्यान वायूगळतीमुळे एक किलोमीटर परिसरात धूर झाला होता. त्यामुळे जालना-भोकरदन रस्त्यावरची वाहतूक दुस-या मार्गानं वळवावी लागली आहे. 


वायूगळती रोखण्यासाठी अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. मात्र त्यांना अपयश आल्याने, औरंगाबादहून विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बुलडोजरच्या मदतीनं टँकर हटवण्याचं काम उशिरापर्यंत सुरु होते. मात्र या वायूगळती आणि धुरामुळे परीसरातली पिके करपल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.