पुणे :  धरणात पुरेसा पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत पुण्यात पाणी कपात सुरूच राहणार  आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खडकवासला प्रकल्पाच्या कालवा समितीची बैठक मुंबईत होणार नसल्याचं बापट यांनी स्पष्ट केलं आहे. पुरेसा पाणीपुरवठा धरणात होत तोपर्यंत ही बैठक घेणार नसल्याचे गिरी़श बापट यांनी सांगितलंय.


महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही या मागणीवरुन काल गोंधळ झाला. कालवा समितीच्या बैठकीत पाणी वापराचे नियोजन केले जाते.


खडकवासला प्रकल्पामध्ये १५.५ टीएमसी पाणीसाठा आहे. पुण्याला गेले १० महिने दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. सध्या पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात सुरू आहे. ती आणखी काही दिवस सुरूच राहील. ती रद्द करून रोज पाणीपुरवठा करण्याची मागणी महापौर प्रशांत जगताप यांनी केली होती. 


बापट यांनी सांगितलं योग्य ते कारण


पालक मंत्री यांनी यावर फक्त पुणे शहराचाच नाही तर जिल्ह्याचाही विचार केला आहे. गिरीश बापट यांनी म्हटलं आहे, 'धरणांत पुरेसा साठा झाल्यानंतरच कालवा समितीची बैठक घेऊ. खडकवासला धरणात सध्या जादा येत असलेले पाणी कालव्याद्वारे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी देत आहोत. तलावात पाणीसाठा वाढविला जाईल. पाझर झाल्याने विहिरीची पाणीपातळी वाढेल. खरीप पिकांना पाणीपुरवठा करताना पिण्याचे पाणी देण्यासाठी तलाव भरण्याची चिंता राहणार नाही. चासकमान धरणाच्या कालवा समितीची बैठक आज होणार आहे.'