नेरुळमध्ये मुलीची छेड काढल्याच्या रागातून १६ वर्षीय मुलाची हत्या
नेरुळमध्ये १६ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आलीय. मुलीची छेड काढल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
नवी मुंबई : नेरुळमध्ये १६ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आलीय. मुलीची छेड काढल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
मुलीच्या तक्रारीनंतर तिच्या घरच्यांनी मुलाला ही जबर मारहाण केली. त्याच मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला. नेरुळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी मुलीचे वडील, भाऊ, आणि मावसभावासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
मृत मुलगा आणि मुलगी अल्पवयीन आहेत. या तरुणाच्या हत्येवरून नेरूळ परिसरात तणाव असून पोलिसांनी अतिरिक्त कर्मचारी मागवून विभागात ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे.