भररस्त्यात तिने एक्स बॉयफ्रेंडला दिला बेदम चोप
चंद्रपूर : प्रेमप्रकरणात दगा झाला तर काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण चंद्रपुरातल्या वरोरा या ठिकाणी बघायला मिळालं. प्रेमात फसलेल्या मुलीने तिच्या प्रियकराला चांगलाच चोप दिला.
या प्रकरणातली मुलगी ही नागपूरची तर मुलगा हा भंडारा जिल्ह्यातला आहे... परीक्षेच्या निमित्ताने दोघजण चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा येथे आले होते... दोघांनींही एकमेकांवर प्रेम केलं. काही दिवसांनंतर मात्र या प्रेमाला ब्रेक लागला आणि मग लग्न करण्याच्या आणाभाका हवेत विरल्या.
मुलीशी ब्रेकअप केलं आणि तो वेगळा झाला. पण तो पुढे गेला मात्र मुलीच्या मनात तो कायमच राहिला. आता तर तो सारं काही विसरुन दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याच्या तयारीत होता. याचा सुगावा मुलीला लागला आणि मग घडलं ते तुमच्या समोरच आहे.