पुणे : संपूर्ण सोन्याच्या शर्टामुळे गोल्डमॅन अशी ओळख मिळवलेल्या दत्तात्रय फुगे यांची हत्या करण्यात आलीये. रात्री साडेअकराच्या सुमारास दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वक्रतुण्ड चिटफंड घोटाळ्यातून गोल्डमॅनची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दिघी येथील भारतमाता नगरमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमाला ते आले होते. यावेळी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला.


दरम्यान, त्यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. 


सोन्याच्या शर्टमुळे चर्चेत


दत्तात्रय फुगे हे तेव्हा चर्चेत आले होते जेव्हा त्यांनी आपल्या सोन्याच्या शर्ट लोकांपुढे आणला होता. तब्बल १ कोटी रुपये खर्चुन त्यांनी हा सोन्याचा शर्ट बनवून घेतला होता. 


वक्रतुंड चिटफंड घोटाळा


फुगे यांनी सुरु केलेला वक्रतुंड चिटफंडही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. गुंतवणुकदारांना दामदुप्पट परतवणुकीचं आश्वासन देऊन फुगे यांनी अनेकांची मुद्दलही परत केली नव्हती. त्यामुळे, अनेक जण त्यांच्यावर नाराज होते. त्यांच्यावर अनेक तक्रारीही दाखल झाल्या होत्या.  


पत्नीचं नगरसेविकापद रद्द


उल्लेखनीय म्हणजे, खोटं बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचं उघड झाल्यामुळे फुगे यांच्या पत्नीचं पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेविका पद रद्द करण्यात आलं होतं.