ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा
दोन वर्षांनंतर ऊसाच्या एफआरपीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढ केलीय.
पुणे : ऊस उत्पादक शेतक-यांना केंद्र सरकारनं दिलासा दिलाय. दोन वर्षांनंतर ऊसाच्या एफआरपीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढ केलीय. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. ऊसाची एफआरपी 2017-18 या वर्षासाठी प्रति टन अडीचशे रुपये वाढवण्यात आलीय.
याआधी ऊसाला प्रति टन 2300 रुपये इतका भाव होता. तो आता 2550 रुपये प्रति टन इतका होणार आहे. एफआरपीचे दर सरकार ठरवते आणि सरकारने ठरवलेल्या दरानुसार साखर कारखान्यांना शेतक-यांच्या ऊसाला भाव द्यावा लागतो.