पुणे : राज्यातील माल वाहतूकदार आज शनिवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार होते. मात्र हा संप आश्वासनानंतर तात्काळ मागे घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने केलेल्या परिवहन शुल्कातील वाढीपाठोपाठ केंद्र सरकारने वाहतूकदारांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये सुमारे ५० टक्के वाढ केली. तसेच टोलवसुली मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. याच्या विरोध करण्यासाठी हा संप पुकारल्याचे माल वाहतूक संघटनेने स्पष्ट केले होते. मात्र, थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये आता २७ टक्केच वाढ करण्यात येईल, असे स्पष्ट केल्यानंतर आज मध्यरात्रीपासूनचा संप मागे घेतला आहे.


सरकारचे हे धोरण वाहतूकदारांसाठी अन्यायकारक असल्याचं सांगत देशातील माल तसेच प्रवासी वाहतूकदारांनीं चक्का जाम करण्याचा निर्णय पुण्यातील बैठकीत करण्यात आला होता. बैठकीत ठरल्याप्रमाणे मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातील माल वाहतूक म्हणजे सर्व प्रकारचे ट्रक्स , टेम्पो, ट्रेलर तसेच कंटेनरची वाहतूक बंद ठेवण्यात येणार होती. आता संप मागे घेतल्याने सर्व वाहतूक आता सुरळीत राहणार आहे.