औरंगाबाद : जिल्हापरिषदेसाठी आज मराठवाड्यातही मोठ्या उत्साहात मतदान झालं. काँग्रेस राष्ट्रवादीची पारंपारिक बालेकिल्ले ताब्यात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपची जोरदार लढाई रंगल्याचे चित्र संपूर्ण मराठवाड्यात दिसले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात एमआयएमसह, काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपने चांगलच आव्हान उभं केलं होतं. औरंगाबादमध्ये सुमारे 65 टक्के मतदान झालं. बीडच्या लढाईतही यावेळी  धनजंय मुंडे विरुद्ध पकंजा मुंडे असा सामना रंगलेला दिसला. बीड जिल्हा परिषद 60 गट आणि 120 पंचायत समिती गणासाठी सरासरी 64 टक्के मतदान झालं. जालना जिल्ह्यात सरासरी अंदाजे ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं.  उस्मानाबादमध्येही मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दाखवत ६५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.


लातूरच्या परंपरांगत देशमुखाच्या वर्चस्वाला निलंगेंकराचे चांगलंच आव्हान उभ राहिलं होत. लातूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सुमारे ७४ टक्के मतदान झालं. नांदेडमध्येही अशोक चव्हाणांनी आपला गड राखण्यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली, नांदेडमध्ये सुमारे ६४ टक्के मतदान झालय. तर परभणीमध्ये ६६ टक्के आणि हिंगोलीमध्येही ६४ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.