प्रशांत परदेश, धुळे : गुढीपाडव्याच्या गुढीसोबत साखरेच्या दागिन्यांचा प्रसाद म्हणून सजविण्याची पद्धत आहे. या सणाला साखरेच्या गाठींचे अनन्य साधारण असं महत्त्व आहे. साखरेंच्या गाठीशिवाय गुढीची कल्पना करवत नाही. त्यामुळे परंपरेने साखरेच्या गाठी बनविणारी कुटुंब आपला वडिलोपार्जित व्यवसायात मग्न आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुढीपाडवा हा सण चैतन्याचा, नव संकल्प करण्याचा आणि संकल्प पूर्तीचा..या सणानिमित्त साखरेच्या गाठींचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. त्यामुळे बदलत्या काळात हि परंपरेने गाठी तयार करणारी कुटुंब या सणाची चाहुल लागताच आपल्या उद्योगाला लागतात. विशेषकरून धुळ्यात साखरेचे दागिणे आणि गाठी तयार करणारी कुटुंब हि मुस्लिम समाजाची आहेत. होळी आणि गुढीपाडवा हे सण जवळ आले की हि कुटुंब या गाठी बनविण्याच्या कामात व्यस्त होतात. कित्येक पिढ्यांपासून साखरेचा गोडवा गुडीपाडवा आणि होळीला टीकून राहावा यासाठी हि कुटुंब या सणादिवशी व्यस्त असतात.  


गुढीपाडव्याला साखरेच्या गाठींची संपूर्ण राज्यभर मागणी असते. मात्र यावर्षी साखरेचे भाव वाढल्याने गाठी बनविण्याच्या उद्योगाला काही अंशी घरघर लागलीय. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सणांचा गोडवा टीकून राहण्यासाठी हि कुटुंब प्रयत्न करताहेत.