नाशिक : राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्ताधारक नाशिकमध्ये आणखीन एक जोरदार धक्का बसलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 39 चे नगरसेवक गुलजार कोकणी पक्षाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. नाशिकमध्ये 2012 साली मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या तीन मुस्लिम नगरसेवकांपैंकी गुलजार कोकणी हे एक आहेत. 


आज दुपारी मुंबईत ते अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. महानगरपालिेका निवडणुकीच्या तोंडावर पक्षातली ही गळती मनसेला भलतीच भारी पडू शकते.