गुटखाबंदीची पुण्यात ऐशीतैशी... झी २४ तासचा पर्दाफाश
पुण्यात लोणी काळभोरमध्ये सर्रास गुटखाविक्री सुरू आहे.
लोणीकाळभोर : राज्यात गुटखाबंदी आहे. तसा कायदाच आहे. मात्र पुण्यात लोणी काळभोरमध्ये सर्रास गुटखाविक्री सुरू आहे.
गुटखा विक्रीची चित्रफितच झी 24 तासच्या हाती लागली आहेत. किराणा दुकानाती सर्रास गुटखाविक्री केली जात असल्याचं स्पष्ट दिसतंय. ही विक्रीही एक दोन पुड्यांची नाही तर होलसेल पद्धतीने गुटख्याच पुडेच्या पुडे विकले जातायत.
पोती भरभरून गुटख्याची विक्री केली जातेय. गुटख्याचा किती मोठा साठा असू शकतो याची कल्पना यातून येईल. सर्वच ब्रँडचे गुटखे इथे विक्रीला उपलब्ध आहेत.
स्थानिक पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन काय करतंय असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय. संबंधित सरकारी यंत्रणा आणि गुटखा माफियांचं साटंलोटं आहे का अशी शंका यामुळे घेतली जातेय.
झी २४ तासचा Exclusive व्हिडिओ