महाडिक खरंच राष्ट्रवादीचे खासदार? मुश्रीफांचा वार
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आलीय.
कोल्हापूर : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यातला वाद चव्हाट्यावर आलाय. धनंजय महाडिक हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेहमीच पक्षविरोधी भूमिका घेतात. त्यामुळं ते राष्ट्रवादीचेच खासदार आहेत का? असा सवाल मुश्रीफ यांनी केलाय.
यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केलाय. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या पक्षविरोधी कारवाया सहन करत आलो आहोत... आता त्यांची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचंही मुश्रीफ यांनी म्हटलंय. त्यामुळं धनंजय महाडिक आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलंय.