नांदेड : पोलिसांना लाच देण्यासाठी आईचे मंगळसूत्र विकावे लागल्याची घटना नांदेडमध्ये समोर आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कौटुंबिक गुन्ह्यात अटक न करण्यासाठी जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाण्यातील एका पोलिसाने पीडित युवकाकडे लाच मागितली होती. 


तपासनिक अंमलदार असलेल्या पोलीस जमादार उद्धव घुले याने दहा हजाराच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने पैसे देऊ शकत नसल्याचे सांगितल्यानंतरही लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याने पाच हजार रुपयांची मागणी केली.


यावेळी आईचं मंगळसूत्र विकून या युवकाने लाच देण्यासाठी पैसे गोळा केले. याबाबत पीडित युवकाने एसीबीकडे तक्रार केली. त्यावेळी सापळा रचून लाचखोर पोलिसाला एसीबीने रंगेहाथ अटक केलीय.