महाराष्ट्रात कितीही दुष्काळ असला तरी इथं पाणी असतचं! बदलापुरमधील चावीच्या आकाराची प्राचीन विहीर

बदलापुरमधील चावीच्या आकाराची विहीर पर्यटकांना आकर्षित करते.   

| Jun 03, 2024, 23:52 PM IST

Ancient well in key shape at badlapur devloli village : बदलपूर... मुंबई अगदी जवळचे ठिकाण... लोकलमुळे बदलापूर चांगलेच चर्चेत आले आहे. मात्र, बदलापुरची आणखी एक वेगळी ओळख आहे. बदलापूर (Badlapur) शहराला तर इतिहासाचा वारसाच लाभलेला आहे. अनेक प्राचीन वास्तूंचे अवशेष इथं पहायाला मिळतात. यापैकी एक आहे ती अनोखी विहीर.

1/7

महाराष्ट्रातील अनेक वास्तू या इतिहासाच्या साक्षीदार आहेत. यामध्ये प्राचीन विहीरांचा देखील समावेश आहे. अशीच एक विहीर बदालपूरमध्ये देखील आहे. 

2/7

साधारण 70 ते 72 फूट खोली असलेल्या या विहिरीवर मध्यभागी गणपतीचे शिल्प कोरलेले आहे. कडेच्या भिंतीवर हत्तींचे शिल्प कोरण्यात आले आहे.   

3/7

 कातळावर कातळ रचून, चुना किंवा इतर कशाचाही वापर न करता ही विहीर बांधण्यात आली आहे. विहिरीत उतरण्यासाठी कातळाच्याच पायऱ्या आहेत. 

4/7

काळ्या कातळातील चावीच्या आकाराच्या या विहीरीचे बांधकाम सोळ्याव्या शतकातील असे तज्ञ सांगतात. 

5/7

बदलापूर पश्चिम शहरी भागापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर देवळोली या गावात ही अनोखी विहीर आहे.   

6/7

या विहीरीचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात कितीही दुष्काळ असला तरी या विहीरीचे पाणी कधीच आटत नाही.   

7/7

बदलापुरमध्ये चावीच्या आकाराची प्राचीन विहीर आहे.