मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंदी, वाहतूक पर्यायी मार्गाने
मुंबई-गोवा महामार्गवर पडलेले खड्डे आणि महाड येथील दुर्घटनास्थळी सुरु असलेल्या शोध कार्यात अडथळे निर्माण होऊ नये यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गवर पडलेले खड्डे आणि महाड येथील दुर्घटनास्थळी सुरु असलेल्या शोध कार्यात अडथळे निर्माण होऊ नये यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कोकणात जाणारी वाहने अन्य मार्गाने वळवण्यात आलीत. अवजड वाहने मध्येच बंद पडल्यास मदतकार्यात येऊ अडथळा शकतो. यामुळे मदतकार्यात आलेली वाहने अडकण्याची भिती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.अशी माहिती रायगड जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी माहिती दिली आहे.
मुंबईहून कोकणात जाण्यासाठी पर्यायी मार्ग मुंबई पुणे द्रुतगती मार्ग सातारा- उंब्रज- पाटण- चिपळूण, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग सातारा- कराड- कोल्हापूर- राधानगरी मार्गे कणकवली तर मुंबई पुणे द्रुतगती मार्ग सातारा- कराड- कोल्हापूर- आंबोली मार्गे सावंतवाडी
1. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (सातारा- उंब्रज- पाटण- चिपळूण)
2. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग( सातारा- कराड- कोल्हापूर- राधानगरी मार्गे कणकवली)
3. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (सातारा- कराड- कोल्हापूर- आंबोली मार्गे सावंतवाडी)