वाढदिवशी 5 आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत
राजकीय नेते किंवा संस्था चालकांचे वाढदिवस म्हणजे अवाढव्य खर्च आणि शहरात विविध ठिकाणी लागलेले होर्डींग्ज हे चित्र सररास पाहायला मिळतं. मात्र नाशिकच्या वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाला नवा पायंडा घातला.
नाशिक : राजकीय नेते किंवा संस्था चालकांचे वाढदिवस म्हणजे अवाढव्य खर्च आणि शहरात विविध ठिकाणी लागलेले होर्डींग्ज हे चित्र सररास पाहायला मिळतं. मात्र नाशिकच्या वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाला नवा पायंडा घातला.
कोणतीही पोस्टरबाजी किंवा अवाढव्य खर्च न करता आव्हाड यांनी आपला वाढदिवस शेतकरी कुटुंबियांसोबत साजरा केला. सिन्नर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली. सिन्नर तालुक्यातील मोह, पांगरी, खंबाळे, केदारपूर, सिन्नर भागातल्या 5 आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी 21000 रूपयांची मदत केली. झी 24 तासच्या लातूर दुष्काळाची बातमी बघताच वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.