नागपूर : शहरात गाजलेल्या युग चांडक हत्याकांड प्रकरणात आज उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या  प्रकरणातील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. अरविंद सिंघ आणि राजेंद्र लवादे अशी या आरोपींची नावं आहेत.


जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आवाहन देणारी याचिका या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने आज निकाल देतांना जिल्हा न्यायालयाच्याच निकालावर शिक्कामोर्तब केलाय. १ सप्टेंबर २०१४ ला नागपूरच्या छापरू नगर परिसरातील एका उच्चभ्रू परीवारातील युग चांडक या ८ वर्षाच्या मुलाचे अपहरण आणि खून करण्यात आला होता. याप्रकरणी या दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.