मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषद आमदारांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात येणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदारांच्या वेतनात वाढ करण्याबाबतचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती, उपसभापती, दोन्ही सभागृहातले विरोधी पक्षनेते आणि सर्व आमदारांच्या वेतनात ही वाढ असेल. 


यामुळे आता आमदारांचं मासिक वेतन दीड लाखांपर्यंत जाणार आहे, तर निवृत्त आमदारांना 50 हजार रुपये वेतन मिळणार आहे. या विेधेयकामुळे आमदारांना प्रधान सचिवांइतका भत्ता, मंत्र्यांना मुख्य सचिवांइतका वेतन भत्ता मिळणार आहे.


पाहा कधी वाढला पगार


- आमदाराच्या पगारात दुपट्टीने वाढ
- मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या पगारातही भरघोस वाढ
- आमदाराचे वेतन ७५ हजारावरून दीड लाख रुपयांवर
- आमदाराच्या निवृत्तीवेतनात १० हजारांची वाढ
- निवृत्तीवेतन ४० हजाराहून ५० हजार, प्रत्येक टर्मला १० हजार अतिरिक्त
- आमदारांच्या पीएंच्या पगारात १५ हजारावरून २५ हजार
- १० हजार पगार देऊन टेलिफोन आॅपरेटर ठेवण्याची आमदारांना मुभा