अंबरनाथ : गृहकर्जाच्या नावावर दोनशेहून अधिक जणांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाला अटक कण्यात आले आहे.  दरम्यान फायनान्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महालक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या विनायक पातरवार आणि परब नावाच्या ठकसेनांनी ग्लोबल एक्स्प्रेस सोल्युशन नावाने फायनान्स कंपनी सुरु केली होती. या कंपनीच्या माध्यमातून चाळीच्या घरांवर गृहकर्ज देण्याची बतावणी केली. कर्ज मिळत असल्याने इथल्या नागरिकांनी घराची कागदपत्रं देऊन कर्जाची मागणी केली. या लोकांकडून या दोन ठकसेनांनी चेक घेतले. यानंतर फायनान्स कंपनीच्या नावाने कर्ज मंजुरीचे पत्र या लोकांना देण्यात आले.


कर्ज मंजूर झाल्याचा भास निर्माण करुन रोख स्वरुपात पैसे घेतले. यानंतर या ठकसेनांनी या लोकांना चेक दिले. मात्र, हे चेक बनावट असल्याने ते बँकेत बाउन्स झाल्यानंतर नागरिकांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.