मुंबई : राज्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचं कमळ फुललं आहे. आत्तापर्यंत जाहीर झालेल्या 3510 जागांपैकी तब्बल 851 जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आलेत. या यादीमध्ये काँग्रेसचे 643, राष्ट्रवादीचे 638 तर शिवसेनेचे 514 नगरसेवक विजयी झाले आहेत.


तर मनसेला 16, बसपाला नऊ, इतर 119, स्थानिक आघाडी 384, अपक्ष 324 आणि कम्युनिस्ट पक्षाला 12 जागांवर यश मिळालं.