यवतमाळ : धक्कादायक बातमी. लग्नानंतर चार मुली झाल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण करत मुलींसह तिला घराबाहेर काढण्याचा संतापजनक प्रकार घडला. यवतमाळच्या पुसद तालुक्यामधल्या वडद गावात ही घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्ञानेश्वर मदन राठोड असे या क्रूर पतीचे नाव आहे. मुलगाच हवा म्हणून तो पत्नी कविताला वारंवार छळत होता. रामनगर दिग्रस इथे राहणाऱ्या कविताचा वडदमधल्या ज्ञानेश्वर राठोडबरोबर २००८ साली विवाह झाला.


लग्नानंतर या दाम्पत्याला चार मुली झाल्या. मुलगा का होत नाही म्हणून ज्ञानेश्वर कविताचा छळ करायला लागला. तिला घराबाहेर काढून माहेरून पैसे आणण्याचा तगादाही त्याने लावला होता. अखेर तंटामुक्ती अध्यक्ष आणि नातेवाईकांच्या मध्यस्तीने चार मुलींसह कविता परत सासरी नांदायला आली. 


मात्र मुलगा का होत नाही असा सवाल करत पती आणि सासरच्या मंडळींनी तिला मारझोड करून सगळ्यांसमोर घराबाहेर काढले. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.