सांगली : सांगलीत गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सांगलीतल्या म्हैशाळ परिसरात हा सगळा प्रकार उघड झालाय. जमीन जेसीबीने खोदण्यात आली त्यावेळी जमिनीत 19 पुरलेल्या पिशव्या आढळल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिशव्यांमध्ये मृत भ्रूणाचे अवशेष आणि हाडं सापडली, त्याचप्रमाणे आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षकांनी दिलीय. या प्रकरणी आरोपी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे हे फरार असून ते बीएचएमएस डॉक्टर आहेत.


या ठिकाणी बेकायदेशीर शस्त्रक्रिया आणि गर्भपात करत असल्याचं तपासात उघड झालंय. मणेराजुरीमधील एका महिलेची गर्भलिंग चाचणी करून गर्भपात करत असताना या दवाखान्यात तिचा मृत्यू झाला. पोलीस तपासात या दवाखान्यात गर्भपात होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.