लातूर : १९ लाखांच्या ५०० आणि हजारच्या जुन्या नोटा बदलून दिल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रमधील चौघांना निलंबित करण्यात आलं. लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र उदगीरच्या मुख्य शाखेतील बँक अधिकारी विकास कदम आणि अन्य तीन जणांनी काही व्यापाऱ्यांची १९ लाखांच्या जुन्या नोटांची रोकड बदलून दिल्याप्रकरणी निलंबीत केलं. 


चलनातील बाद झालेल्या ५०० आणि हजाराच्या जुन्या नोटांचा समावेश होता. हा प्रकार २१ नोव्हेंबरला घडल्याचे बँक प्रशासनाच्या लक्षात आलं. याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी माध्यमांशी बोलण्याचे टाळतायत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.