अवैध रेती उपसा करणाऱ्यांना दणका, ७२ कोटींपेक्षा जास्त यंत्रसामग्री नष्ट
कल्याण रेतीबंदर परिसरात बुधवारी दुपारनंतर ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करणाऱ्यांना दणका दिला.
ठाणे : कल्याण रेतीबंदर परिसरात बुधवारी दुपारनंतर ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करणाऱ्यांना दणका दिला.
कल्याणमध्ये आज दुपारी जप्त केलेली यंत्रसामग्री आणून रेतीसाठ्याची मोजदाद करण्याचं काम सुरू आहे. तब्बल ७२ कोटींपेक्षा जास्त यंत्रसामग्री नष्ट करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी सुरू केलेली कारवाई सुरूच आहे.
आज पहाटेपर्यंत जिल्हाधिकारी स्वतः या कारवाईवर लक्ष ठेऊन होते. ठाणे जिल्हाधिकारी, पोलीस उपायुक्त संजय शिंदे आणि कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त ई रविंद्रन यांनी एकत्रितरित्या छापा मारत ही कारवाई केलीय. एकाचवेळी संयुक्तरित्या झालेली ही पहिलीच मोठी कारवाई मानली जातेय.