तिकीट न दिल्याने ठाणे शहर भाजप पदाधिका-यांमध्ये नाराजी
कित्येक वर्षं पक्षाचं निष्ठेनं काम करुनही तिकिट नाही मात्र दोन दिवसांपूर्वी बाहेरुन आलेल्यांना तिकीटं दिल्यानं ठाणे शहर भाजप पदाधिका-यांमध्ये कमालीची नाराजी आहे.
ठाणे : कित्येक वर्षं पक्षाचं निष्ठेनं काम करुनही तिकिट नाही मात्र दोन दिवसांपूर्वी बाहेरुन आलेल्यांना तिकीटं दिल्यानं ठाणे शहर भाजप पदाधिका-यांमध्ये कमालीची नाराजी आहे.
त्याचाच भाग म्हणून, भाजपचे तब्बल 22 नाराज इच्छुक आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. इनकमिंगमध्ये आघाडीवर असलेल्या भाजप पक्षात तिकिटाचं आमिष दाखवून, अनेक आयारामांना घेतलं गेलं.
त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप, भाजप कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी केलाय. पत्रकार परिषदेत त्यांना आपल्या नाराजीला वाट मोकळी करुन दिली. तिकिट वाटपात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय.