मुलाच्या मृत्यूनंतर सासरच्यांकडून सुनेचा अमानुष छळ
पतीच्या मृत्यूनंतर सासू-सासऱ्यांनी एक वर्ष सुनेला खोलीत डांबून छळ केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडलीय.
नांदेड : पतीच्या मृत्यूनंतर सासू-सासऱ्यांनी एक वर्ष सुनेला खोलीत डांबून छळ केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडलीय.
तीन वर्षांपूर्वी रिक्षातून प्रवास करताना पीडितेच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर सुनेला मानसिक आधार देण्याऐवजी तिला वर्षभर एका खोलीत कोठडीत डांबलं होतं. जेव्हा ती मरणासन्न अवस्थेत पोहोचली तेव्हा तिला सासरच्यांनी अमरावतीत माहेरी आणून टाकलं.
अमरावती पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. मात्र, तीन दिवस उलटून गेले तरीही सासरच्यांवर कारवाई केलेली नाही. एवढंच नव्हे तर नांदेड पोलिसांनाही यांसदर्भात कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पोलिसांनीच दुर्लक्ष केल्यामुळं प्रकरण चिघळल्याचा आरोप माहेरच्यांनी केलाय.
पीडित महिला रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या चिमुकल्या मुलांकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झालाय.