नाशिक: केबीसी घोटाळ्यातला मुख्य सुत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण या दोघांच्या बँकेतल्या ठेवी आणि लॉकरची तपासणी केली गेली. त्यांच्या 2 लॉकरमधून तब्बल 2 कोटी 4 लाखांचं सोनं ताब्यात घेण्यात आलं. तर आतापर्यंत 109 कोटींचा मुद्देमाल ठकसेन भाऊसाहेब चव्हाणकडून हस्तगत करण्यात आला आहे. भाऊसाहेबाच्या आणखी दोन लॉकरची तपासणी उद्या होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाणला पोलिसांनी 6 मेला मुंबई विमानतळावरून अटक केली होती. भाऊसाहेब चव्हाणनं राज्यातल्या केबीसीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना तब्बल 220 कोटी रुपयांचा गंडा घातलाय. 


नाशिक, हिंगोली, परभणी, नांदेड, औरंगाबाद, बीड आणि इतरही जिल्ह्यातल्या गुंतवणूकदारांना भाऊसाहेब चव्हाणनं गंडवलं होतं.