जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथल्या जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर पाटील, कॅशिअर रवीशंकर गुजराथी यांची सीबीआयच्या पथकाकडून संपूर्ण दिवस चौकशी करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबंदीच्या काळात हजार पाचशेंच्या नोटा बदलून देण्याच्या व्यवहाराची चौकशी होत असल्याची माहिती आहे. 


बँक व्यवस्थापक पाटील तसंच कॅशियर गुजराथी यांनी ७३ लाखांच्या नोटांची अदलाबादल केल्याने या दोघांची चौकशी करण्यात आली. माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आहेत. 


सीबीआयचे एक पथक जिल्हा बँकेच्या जळगावमधील मुख्य शाखेत कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांची चौकशी करत आहे. देशमुख यांच्यावर सीबीआय पथकाने गुन्हा दाखल केल्याचीही माहिती आहे.