मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवाराची माहिती आता अॅपवर मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याची टंचाई असलेल्या 25,000 गावांमधील दुष्काळ संपवण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय. 


आत्तापर्यंत दोन वर्षात सुमारे 11,000 जलयुक्त शिवारची कामं झाली. यावेळी पाऊस चांगला झाल्यानं जलयुक्त शिवारचं यश समोर आलं. अॅपमध्ये प्रत्येक जलयुक्त शिवारच्या कामाबद्दलची सर्व माहिती मिळणार आहे. 


जलयुक्त शिवारच्या कामाबद्दल याचिका दाखल झाल्यानं कामाच्या दर्जाबद्दल टीका झाल्यानं पारदर्शकपणा आणण्यासाठी सरकारकचा हा एक प्रयत्न आहे. 


जलयुक्त शिवारची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावी यासाठी सरकारनं अॅपचं माध्यम निवडलंय.