नवी दिल्ली : जेएनयू विद्यापिठातील ९ फेब्रुवारी रोजी देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. या सात व्हिडीओंमधील तीन व्हिडीओंमध्ये गंभीर फेरफार करण्यात आल्याचं, फॉरेन्सिक तपासात स्पष्ट झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली सरकारकडून संबंधित ध्वनिचित्रफितींचे काही नमुने हैदराबाद येथील सत्यता पडताळणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यापैकी ३ व्हिडिओ क्लिप्समध्ये गंभीर फेरफार करण्यात आल्याचा अहवाल आहे.


या क्लिप्समध्ये काही विशेष शब्द टाकण्यात आल्याचे तपासणीदरम्यान स्पष्ट झाले आहे. दिल्ली सरकारने यापूर्वीच दिल्ली पोलिसांच्या याप्रकरणातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 


देशविरोधी घोषणा प्रकरणातील सर्वात महत्वाचा पुरावा


दिल्लीतील आप सरकारने अभाविपवर संशय घेतला होता. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान ‘जेएनयू’मध्ये ९ फेब्रुवारीला आंदोलन सुरू असताना सुरक्षारक्षकाने केलेले चित्रीकरण, विद्यापीठातील अंतर्गत सूत्रांकडून मिळालेली माहिती आणि प्रत्यक्षदर्शींचे जाबजबाब नोंदविण्यात आले होते.


व्हिडीओ क्लिप्समध्ये ही गंभीर फेरकार कुणी केली?


या घटनेशी संबंधित अनेक व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणत्याही क्लिपमध्ये कन्हैयाकुमार देशद्रोही घोषणा देत नसताना दिसतोय. तसेच विद्यापीठाच्या परिसरातील देशद्रोही घोषणाबाजीनंतर कन्हैयाने केलेल्या भाषणात तो देशविरोधी बोलला, असे एकाही प्रत्यक्षदर्शीने म्हटलेले नाही. 


याशिवाय, क्लिप्समध्ये त्या दिवशी पाकिस्तान जिंदाबाद अशाप्रकारच्या घोषणा दिल्याचेही ऐकू येत नाहीत, असंही सांगण्यात येत आहे. तेव्हा आता सर्वात महत्वाचा प्रश्न हा उभा राहणार आहे की, व्हिडीओ क्लिप्समध्ये ही गंभीर फेरकार कुणी केली आणि ही फेरफार करण्यामागे काय उद्देश होता?.