चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवारांच्या तिकीट वाटपाचा घोळ
शहर मनपाची निवडणूक 19 एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज स्विकारणं सुरू आहे. मात्र काँग्रेस उमेदवारांच्या तिकीट वाटपाचा घोळ संपता संपत नाहीए. काँग्रेसच्या दोन गटांच्या इच्छुक उमेदवारांचे मुलाखतीचे 3 फार्स आटोपले आहेत.
चंद्रपूर : शहर मनपाची निवडणूक 19 एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज स्विकारणं सुरू आहे. मात्र काँग्रेस उमेदवारांच्या तिकीट वाटपाचा घोळ संपता संपत नाहीए. काँग्रेसच्या दोन गटांच्या इच्छुक उमेदवारांचे मुलाखतीचे 3 फार्स आटोपले आहेत.
तिकीट कुणाला मिळणार याबाबत संभ्रम कायम आहे. दोन गटांच्या स्वतंत्र्य मुलाखती झाल्या आणि दोन्ही ठिकाणी पक्ष निरीक्षकांनी हजेरी लावली. 66 तिकिटं देण्यासाठी आठवडाभरात काँग्रेसच्या मुलाखतीचे 3 फार्स आटोपले. तर 12 बंडखोर नगरसेवकांना तिकीट मिळेल असा सूर असल्याने नाराजी पाहायला मिळतेय. मात्र नेमकं कुणाला तिकीटं मिळेल यामुळे पक्ष कार्यकर्ते संभ्रमात आहेत.