कल्याण : तब्बल आठ तास उलटले तरीही कल्याण-कर्जत वाहतूक ठप्प आहे. दोन तासांपासून अंबरनाथ आणि बदलापूरकडून मुंबईच्या दिशेनं एकही ट्रेन रवाना झालेली नाही. दिलासा दायक बाब ही की घसरलेल पाच डबे आता काही वेळापूर्वीच रुळांवर आणून बाजूला काढण्याचं काम सुरू झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी सहा वाजता विठ्ठलवाडी आणि कल्याण दरम्यान कुर्ला अंबरनाथ गाडीचे पाच डबे घसरले आहेत. त्यामुळे सकाळपासून कर्जतकडून कल्याणकडे येणारी आणि कल्याणकडून अंबरनाथ, बदलापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. अपघात इतका भीषण होता, की कल्याण आणि विठ्ठलवाडी दरम्यानच्या डाऊन ट्रॅकचं मोठं नुकसान झालंय. 


पहाटेच्या वेळी डाऊन लोकलमध्ये प्रवासी नसल्यानं मोठी जीवित हानी टळलीय.. रेल्वे रुळाला तडा गेल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.. रुळाच्या दुरुस्तीचे काम तीन टप्प्यात सुरु आहे. अप लाइनवरुन लोकल वाहतूक सुरू करण्यात आलीय.


पाऊण तासाने एक गाडी सुरू आहे. गाडी जात असताना 500 मीटरवरील काम पंधरा मिनिटांसाठी थांबवावे लागत आहे . त्यामुळे दुरुस्तीच्या कामाता अडथळा निर्माण होतोय. दुपारी चार वाजेपर्यंत हे दुरुस्तीचे काम पूर्ण होईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येतेय.. मात्र सध्याची परिस्थिती पाहता रात्रीपर्यंत काम सुरु राहण्याचा अंदाज आहे.