नागपूर : कन्हैया कुमारविरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी देत गोंधळ केला. यावेळी कन्हैया कुमारच्या दिशेने चप्पल फेकणाऱ्यांला कार्यक्रमाच्यावेळी उपस्थितांनी चोपून काढले.


तणावाचे वातावरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरमध्ये दाखल झालेल्या कन्हैय्या कुमारच्या गाडीवर काही लोकांनी दगडफेक केली होती. दगडफेक करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचं सांगितले जात आहे. याच कार्यकर्त्यांनी पुन्हा कन्हैय्याच्या भाषणाच्यावेळी गोंधळ घातला. भाषण सुरु असताना एकाने चप्पल भिरकावली. मात्र, ती चप्पल कन्हैय्याला लागली नाही. त्याचवेळी उपस्थितांनी चप्पल फेकणाऱ्याला चांगलेच बदडून काढले. त्यामुळे कार्यक्रमास्थळी तणावाचे वातावरण होते.


कन्हैय्यावर यापूर्वीही हल्ला


कन्हैय्यावर हल्ला होण्याची ही काही पहिली वेळ नाही. गेल्या महिन्यातही जेएनयूमध्ये एका तरुणानं कन्हैय्या कुमारच्या थोबाडात लगावली होती. तसंच शिव्याही दिल्या होत्या. कन्हैय्याला धडा शिकवण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचं त्यानं म्हटलं होतं. यापूर्वी हैदराबादमध्ये कन्हैय्यावर बूट फेकण्यात आला होता.