खारघर पाळणाघर मुलीला मारहाण प्रकरणी खुनाचा प्रयत्न गुन्हा दाखल
खारघर मधील पाळणाघरात दहा महिन्याच्या बाळाला जबर मारहाण केल्या प्रकरणी खारघर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल केला आहे, तसेच पाळणाघराची मालक प्रियंका निकमचा जामीन अर्ज रद्द करण्याबाबत देखील सत्र न्यायालयात गेल्याचे सांगण्यात आले, खारघरमधील पाळणाघरात मुलांची काळजी न घेता त्यांना इजा पोहचविण्याची दुसरी घटना आहे.
खारघर : खारघर मधील पाळणाघरात दहा महिन्याच्या बाळाला जबर मारहाण केल्या प्रकरणी खारघर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल केला आहे, तसेच पाळणाघराची मालक प्रियंका निकमचा जामीन अर्ज रद्द करण्याबाबत देखील सत्र न्यायालयात गेल्याचे सांगण्यात आले, खारघरमधील पाळणाघरात मुलांची काळजी न घेता त्यांना इजा पोहचविण्याची दुसरी घटना आहे.
नवी मुंबईतील खारघरमध्ये असलेल्या पूर्वा नर्सरी आणि पाळणाघरमध्ये 10 महिन्याच्या बाळाला तेथील काम करणाऱ्या बाईने जबर मारहाण केली, याघटनेने परिसरात संतापाचे वातावरण असून, या पाळणाघरात आपल्या पाल्याला ठेवलेले पालक देखील पुढे आले आहेत, अफसाना शेख ही मुलांना मारत असे, याबाबत अनेक वेळा मुलांनी आणि पालकांना याची सूचना पाळणाघर मालक प्रियंका हिला सांगितले होते अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे,
याबाबत या पाळणा घरात राहणाऱ्या पाच वर्षीय निधी ने हि अफसाना काठीने मारत असल्याचे सांगितले,
या प्रकरणाची दखल जिल्हा बाल संरक्षण विभागाने घेऊन पोलिसांना नव्याने 307 चा गुन्ह ,त्याच बरोबर 2015 बाल अधिनियम कलम 74 ,75 , नुसार गुन्हा दाखल केला आहे, पाळणाघर बाबत नियम असून, त्याचे कोणी पालन करत नसल्याचे सांगण्यात आले.
तर खारघर पोलिसांनी प्रियंका निकम यांनचा जामिन रदद् करण्याचा अपील कोर्टा कड़े केला आहे. अफसाना शेख ची पोलिस कस्टडी मिळण्या बाबत ही अर्ज केला आहे. काल पोलिसांच्या कारवाई बद्दल कोणती ही तक्रार मुलीच्या पालकानी आमच्या कड़े केली नाही.
ह्या प्रकरणात आम्हाला बाळाची मेडिकल टेस्ट आणि सी सी टी वी फुटेज तपासणे गरजेच होत त्यामुळे कदाचित थोड़ा विलम्ब झाला असेल पण आम्ही केस घेण्याचा टाळल नाही.
या प्रकरणी दिरंगाई झाली असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल. तसेच परिसरातील डे केअर सेंटरचा सर्वे करणार असल्याचे परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.
तसेच इतर सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येईल आणि इतर मुलांना त्रास झाला आहे का याचाही शोध घेण्यात येईल, असही पांढरे यांनी सांगितले.
आरोपी आहे मानसिक रूग्ण..
आरोपी अफसाना शेख हिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे तिच्या घरच्यांनी सांगितले. या घटने मुळे पालक वर्गात घबराट पसरली आले तरी आता पालकांनी आपल्या पाल्याला जेथे ठेवले आहे त्याची चोकशी करण गरजेचं आहे.आणि पाळणाघर चालवणाऱ्या बाबत नियम कडक करणे गरजेचे आहे.