कोल्हापूर :  येथे आणखी एका बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश झालाय. काँग्रेस नगरसेविका यांच्या कार्यालयावर छापा मारण्यात आलाय. शाह यांच्या नातवासह 
तिघांना अटक अटक करण्यात आलेय. दरम्यान, राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप नगरसेविकेने केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापुरात काँग्रेस नगरसेविका सुरेखा शाह यांच्या ऑफिसवर बेटिंग प्रकरणी छापा टाकण्यात आलाय. विशेष म्हणजे याप्रकरणी त्यांच्या नातवालाही अटक करण्यात आलीय. त्यानंतर कोल्हापुरात नगरसेवकांचं चाललंय काय?, काँग्रेस नगरसेविकेच्या ऑफिसमध्ये बेटिंग? अशी चर्चा रंगली आहे. तसेच राजकीय खडांजगी पाहायला मिळत आहे.


स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव बेटिंगप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेत. त्यामुळे महापालिकेची अब्रु चव्हाट्यावर आली असतानाच आता काँग्रेसच्या नगरसेविका चर्चेत आल्यायत. नगरसेविका सुरेखा शाह यांच्या ऑफिसवर बेटिंग्रप्रकरणी छापा मारण्यात आलाय. 



दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंका सामन्यादरम्यान बेटिंग सुरू असल्याच्या संशयावरून शाह यांच्या महाडिक वसाहतीतल्या कार्यालयावर छापा टाकून तिघांना अटक कऱण्यात आली. त्यामध्ये जवाहर रामचंद्र चंदवाणी, कन्हैया रामचंद्र कातियर आणि गोपी रमेशलाल आहुजा यांचा समावेश आहे. 


विशेष म्हणजे यावेळी शाह यांचा नातू आणि कुख्यात गुंड स्वप्निल तहसीलदार हा पोलिसांशी झटापट करुन फरार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन त्यालाही जेरबंद केलंय. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. 


मात्र काँग्रेस नगरसेविका सुरेखा शाह यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केलाय. कोल्हापूरचे नगरसेवक या ना त्या कारणानं सतत चर्चेत असतात. आता या बेटिंग प्रकरणामुळे पुन्हा एकदा नगरसेवकांचे कारनामे चर्चेत आलेत.