कोल्हापूर : कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तिरुपतीच्या तिरुमल्ला देवस्थानकडून अर्पण केलेल्या शालूचा आज लिलाव करण्यात आला. पाच लाख पाच हजारांना या शालुचा लिलाव झाला. दरवर्षी दस-याच्या मुहुर्ताला करवीर निवासीनी महालक्ष्मीला शालू अर्पण केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातल्या सुभाष यमुळ यांनी यावर्षी शालू घेतला. गेल्या वर्षी अपेक्षित बोली न लागल्यानं देवस्थान समितीला दोन वेळा लिलाव रद्द करावा लागला होता. त्यामुळं यावर्षी काय होतंय, शालूचा लिलाव व्यवस्थित पार पडणार का याकडे लक्ष लागलं होतं.