कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयात मुसळधार पाऊस सुरुच आहे. पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून तीची वाटचाल धोकापातळीकडं सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचगंगा नदीची पाणी पातळी ४१ फूट ४ इंच इतकी असून इशारा पातळी ही ३९ फूट इतकी आहे. तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्याचं पाणी पात्राबाहेर पडल्यामुळं अनेक मार्गावर पाणी आलाय.


जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासात तब्बल १४५४ मीमी पावसांची नोंद झालीय. सर्वाधिक पाऊस हा गगणबावडा तालुक्यात २९३ मीमी इतका पडलाय. 


जिल्ह्यातील सत्तर बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर – रत्नागिरी राज्यमार्ग बंद झालाय. तर कोल्हापूर कोडोली मार्गावरही पाणी आलंय.


या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून प्रशासनानं नदी काठच्या गावांना सतर्क राहाण्याचे आदेश दिलेत.