रत्नागिरी : कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या निळाईचा उत्सव सुरू आहे. समुद्रात गेल्या काही दिवसांपासून या निळ्या पाहुण्यांचं आगमन झाले आहे. गोल बटणाच्या आकाराचे हे निळ्या रंगाचे जेलीफिश सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या माशांचं शास्त्रीय नाव पॉर्पिटा पॉर्पिटा. हे सागरी मासे पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या उष्ण आणि समशितोष्ण पाण्याच्च्या पट्ट्यात आढळतात. 


समुद्रातले प्रवाह आणि वारे यांच्या मर्जीनुसारच या ब्ल्यू बटण फिशना प्रवास करावा लागतो. जोरदार समुद्री वारे आणि प्रवाहांबरोबर हे मासे सध्या कोकणच्या किना-यावर आलेत. 


ब्ल्यू बटण जेलीफिश कोकणच्या किनाऱ्यांवर येणे हे मान्सून आगमनाचे शुभसंकेत समजले जातात. रत्नागिरीतल्या गणपतीपुळे किनाऱ्यावर सहा वर्षापूर्वी असे जेलीफिश आढळले होते.


रत्नागिरीतल्या भाट्ये बीचसह आरेवारे बीचवरही असे ब्लू बटण जेलीफिश लाखोंच्या संख्येने सापडतात. ब्ल्यू बटण जेलीफिश हे विषारी नसतात, पण तरीही त्यांना हात लावू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. 


ब्ल्यू बटण जेलीफिशच्या आगमनामुळे कोकणच्या किनारे आणखी सुंदर दिसत आहेत. कोकणचा समुद्राकिनाऱ्याने निळाईचे रुप घेतले आहे.