योगेश खरे, नाशिक : कोकण आणि गुजरातेतील आंबा खरेदी करून परदेशात पाठवण्याचं काम नाशिकच्या शेतकऱ्यांची कंपनी करतेय. गेल्या वर्षी या कंपनीने पाच हजार टन आंबा प्रक्रिया करून गल्फमध्ये पाठवला होता. यावर्षी युरोपासह दहा हजार टन निर्यात अपेक्षित आहे. 


प्रक्रियेसाठी आंबा नाशकात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा आंबा कुठे कोकणात किंवा बाजारसमितीत विक्रीसाठी नव्हे तर प्रक्रिया करण्यासाठी नाशिक जवळच्या मोहाडी परिसरातल्या सह्याद्री फार्ममध्ये उतरवला जातोय. शासकीय कृषी विभागात असलेल्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमध्ये कुठल्याही नाशवंत मालावर प्रक्रिया केली जाते. सध्या आंब्याचा सीझन असल्याने गुजरातमधून आलेला केशर, कोकणातला हापूस यांच्यावर प्रक्रिया सुरू आहे. रोज अडीचशे टन आंबा इथे येतो. त्याची कापणी होते. त्याचा रस काढला जातो. त्याचं पॅकेजिंग करून निर्यात केली जाते.


दीर्घकाळ आंबा टिकण्यासाठी... 


बाजारातली मागणी पाहून या आंब्याला वजा अठरा अंशापेक्षा कमी तापमानात गोठवून युरोपच्या बाजारात विकलं जातं. यामुळे नाशवंत आंब्याला पुढच्या सीझनपर्यंत टिकवणं शक्य होतं. गेल्या वर्षी गल्फमध्ये पाच हजार टन आंबा प्रक्रिया पद्धतीने निर्यात केला गेला होता. यावर्षी दहा हजार टन निर्यातीचं लक्ष्य आहे.  


गरज प्रक्रिया केंद्रांची


शेतकऱ्यांच्या नाशवंत मालावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक विभागात अशी प्रक्रिया केंद्र उभारण्याची गरज आहे. कोकणात आंब्यासाठी नाशिकमध्ये डाळींब, द्राभ यांच्या साठी अशी केंद्रे उभारल्य़ास शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळू शकतो.