विकास भोसले, झी मीडिया, सातारा : २३ ते २७ मे दरम्यान,बँकॉक थायलंड येथे होणाऱ्या युवा आशिया ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी हॅमर थ्रो या गटात स्नेहा जाधव भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. आई-वडील शेतकरी असूनही त्यांनी मुलीला दिलेलं प्रोत्साहन नक्कीच प्रेरणादायी आहे...पाहूया स्नेहाच्या जिद्दीची कहाणी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा जिल्ह्यातल्या हजारमाची या छोट्याश्या गावात राहणारी स्नेहा जाधव आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे... एथलॅटिक्स या क्रीडा प्रकारात २३मे ते २७मे या दरम्यान होणाऱ्या युवा आशिया एथलॅटिक्स स्पर्धेसाठी  हॅमर थ्रो या गटात तिची निवड झालीये... 


स्नेहा ही कराड अर्बन स्पोर्ट्स क्लबची खेळाडू असून वेणूताई चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे... जिल्हा आणि राज्य पातळीवर तिने अनेक पदकं मिळवलीयत... गेल्या तीन वर्षांपासून ती दिलीप चिंचकर यांच्याकडे प्रशिक्षण घेतेय... भारताला हॅमर थ्रो विभागात सुवर्ण पदक मिळवून देणारच असा विश्वास स्नेहानं व्यक्त केलाय....


आपल्या मुलीने भारताला सुवर्ण पदक मिळवून द्यावं यासाठी स्नेहाच्या आई-वडिल तिला नेहमीच प्रोत्साहन देत असतात... शेतकरी कुटूंबातली ही मुलगी आपल्या कष्टाचं नक्कीच चीज करेल याची त्यांना खात्री आहे... 


शेतकरी कुटूंबातल्या स्नेहानं आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर अनेक पदकं मिळवली... आता भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ती सज्ज झालीये... तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !